
न.प.कडे विवाह नोंदणी ऑनलाईन सुविधा सुरू करण्याची ऍड. अमेय परूळेकर यांची मागणी.
रत्नागिरी न.प. मध्ये विवाह नोंदणी करण्याची कोणत्याही प्रकारची ऑनलाईन सुविधा उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे. विवाह नोंदणी करण्यास आठवड्यातील मंगळवार आणि गुरूवार हे दोनच वार दिलेले आहेत. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी सुद्धा विवाह नोंदणीची सुविधा चालू ठेवावी. विवाह नोंदणी प्रमाणपत्रही उशिरा मिळत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यात सुधारणा करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ऍड. अमेय परूळेकर यांनी केली आहे.
१ जानेवारी २०१ ते १ जानेवारी २०२२ या कालावधीत प्रत्येक महिन्यात प्रत्येक धर्माच्या वधू-वरांची किती विवाह नोंदणीची माहिती मिळावी मागितली होती. त्यानुसार पालिकेने हिंदू विवाहांच्या ८७५, मुस्लिम विवाहांच्या ३५२ तर बौद्ध विवाहांच्या २४ अशा एकूण १२५१ विवाह नोंदी झाल्या असल्याची माहिती रत्नागिरी पालिकेने दिली. आंतरधर्मी विवाह नोंदणीची आकडेवारी नगरपरिषदेकडे नाही.
नोंदणी प्रक्रिया अधिक सुटसुटीत व्हावी यासाठी ऑनलाईन फॉर्म सुविधा चालू करण्यास हरकत नाही. त्याचप्रमाणे फॉर्मचे पैसे सुद्धा ऑनलाईन पद्धतीनेच जमा करण्याची सुविधा चालू करण्यात यावी, यामुळे नागरिकांचा वेळ वाचू शकतो. नगर परिषदेच्या कर्मचार्यांचादेखील वेळ वाचू शकतो, असे परूळेकर यांनी म्हटले आहे.www.konkantoday.com