
रत्नागिरी जिल्ह्यात अद्याप ८० हजार नागरिकांनी पहिला डोस घेतला नाही
ख्रिसमस आणि नववर्षाच्या आगमनाचे कार्यक्रम साध्या पद्धतीने साजरे करावेत. गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन करतानाच मच्छीमारी नौकांवर आणि आंबा बागेत कामासाठी बाहेरुन येणाऱ्या नेपाळी गुरख्यांचे लसीकरणासाठी प्राधान्याने कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटीलयांनी सांगितले.
जिल्ह्यात आतापर्यंत १० लाख १ हजार ५८८ नागरिकांनी पहिला तर ६ लाख १६ हजार ४२६ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. अद्याप ८० हजार नागरिकांनी पहिला डोस घेतलेला नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. हे नागरिक एकतर ग्रामीण भागात असावेत किंवा जिल्ह्याबाहेरही असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
www.konkantoday.com