
काम न करणार्यांना पदाधिकार्यांना बाजूला केले जाईल, खा. तटकरे यांचा इशारा.
राष्ट्रवादी पक्ष ताकदीने मजबूत करण्यासाठी सदस्य नोंदणी मोहीम जोमाने करा, जे पदाधिकारी, कार्यकर्ते सभासद नोंदणीत अग्रेसर राहतील, अशा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार विकास कामांना प्राधान्य दिले जाईल. जे पदाधिकारी व कार्यकर्ते सदस्य नोंदणीमध्ये कमी पडतील, त्यांना बाजूला केले जाईल, अशा स्पष्ट शब्दात सदस्य नोंदणीबाबत कानपिचक्या देत राष्ट्रवादी पक्ष मजबूत करणार्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या पाठिशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी सावर्डे येथे राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत दिला.
यावेळी आ. शेखर निकम, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, निरीक्षक बाप्पा सावंत, प्रदेश उपाध्यक्ष शौकत मुकादम, प्रदेश सरचिटणीस जयंद्रथ खताते, विधानसभा क्षेत्राध्यक्ष रमेश राणे, तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, माजी पंचायत समिती सदस्य बाबू साळवी, माजी सभापती सौ. पूजा निकम, युवक तालुकाध्यक्ष निलेश कदम, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ. साधना बोत्रे, सौ. दिशा दाभोळकर, महिला आघाडी तालुकाध्यक्ष सौ. जागृती शिंदे, शहराध्यक्षा सौ. आदिती देशपांडे, माजी सभापती सौ. रिया कांबळे आदी उपस्थित होते.www.konkantoday.com