
लांजा, रत्नागिरी, राजापुरातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत आ. राजन साळवींचा दबदबा
रत्नागिरी : उपनेते तथा आमदार डॉ. राजन साळवींच्या नेतृत्वाखाली राजापूर, लांजासह रत्नागिरीमध्येही अपेक्षेप्रमाणे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे संघटनेने यश मिळवत ग्रामपंचायतीवर भगवा फडकविला आहे. ग्रामपंचायतीच्या निकालानंतर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे संघटनेने आपले वर्चस्व सिध्द करीत कोकण हा मूळ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, हे सिध्द केले आहे. राजापूर तालुक्यात एकूण 10 ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले असून त्याठिकाणी 8 ग्रामपंचायतीवर तर लांजामध्ये 15 पैकी 9 ग्रामपंचायतीवर व रत्नागिरीमध्ये 4 पैकी 3 ग्रामपंचायतीवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे संघटनेने भगवा फडकवला आहे.