
रत्नागिरी : जिल्हा परिषदेचे लोकप्रिय मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक कीर्तीकिरण पुजार यांची पदोन्नतीने बदली झाली असून, गुरुवारी (२७ फेब्रुवारी) ते धाराशिवचे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.
कीर्तीकिरण पुजार हे ऑक्टोबर २०२२ ला रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून हजर झाले होते. अतिशय कमी कालावधीमध्ये त्यांनी उत्तम काम केले असल्याने ते अल्पावधीतच एक लोकप्रिय मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून प्रसिद्ध झाले होते. त्यांनी बांधकाम, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण आदी कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले.कीर्तीकिरण पुजार यांचा सोलर प्रोजेक्ट आणि हाऊस बोट हे दोन ड्रीम प्रोजेक्ट नुकतेच मार्गी लागले आणि त्यांच्या बदलीची ऑर्डर आली.
सर्वांचेच उत्तम सहकार्य लाभले असल्याची प्रतिक्रिया धाराशिवचे नूतन जिल्हाधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी व्यक्त केली आहे.