
बांगलादेशात शेख हसीना यांचे जोरदार कमबॅक; ‘या’ निवडणुकीत दणदणीत विजय
ढाका: बांगलादेशात शेख हसीना यांच्या सत्तापालटानंतर मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकारची स्थापन झाली.त्यानंतर शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतला. दरम्यान आता बांगलादेशात लवकरच निवडणुका होणार आहेत. यावेळी बांगलादेशच्या चपैनवाबगेज येथे काल झालेल्या जिल्हा वकिल संघ (बार असोसिएशन) निवडणुकीत माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाने दणदणीत विजय मिळवला आहे.यामुळे सध्या सत्तेवर असलेल्या मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारला मोठा झटका बसला आहे. देशाचील राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
चपैनवाबगंज जिल्हा वकील असोसिएशनची कार्यकारी समिती निवडण्यासाठी सोमवारी (24 फेब्रुवारी) मतदान पार पडले. सकाली 10 वाजता मतदानाची प्रक्रिया सुरु झाली आणि 3 वाजेपर्यंत चालली. त्यानंतर मतमोजणीला सुरुवात झाली. रात्री 8.30 वाजता अंतिम निकाल जाहीर करण्यात आला.यामध्ये अवामी लीद समर्थित पॅलने विजय मिळवला. या निवडणुकीत 3 पॅनल आणि काही अपक्ष उमेदवारांसह एकूण 34 उमेदवार होते. अवानी लीग समर्थित “मनिरुल-डोलर परिषद” या पॅनलने 6 पदे जिंकली.
येत्या दोन दिवसांत नव्या पक्षाची अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. यामुळे बांगलादेशच्या राजकीय वातावरणात मोठे बदल होऊ शकतात. मात्र, निवडणुका कधी होणार यावर अद्यापही प्रश्नचिन्ह आहे. युनूस यांनी 2025 च्या अखेरीस निवडणुका होऊ शकतात, असे सांगितेल आहे. तर काही राजकीय तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, नव्या युवक नेतृत्वाच्या पक्षामुळे बांगलादेशच्या राजकारणात मोठे बदल होतील.