
राजापूर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन लवकर
माजी खासदार तथा शिवसेना नेते विनायक राऊत यांच्या हस्ते होणार उद्घाटन
गद्दारांना गाढून निष्ठेची गुढी उभारण्यासाठी राजापूरकर सरसावले.
राजापूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नूतन कार्यालयाच्या उद्घाटनाचे नियोजन करण्यासाठी तालुका कार्यकारणीची सभा येथील मातोश्री हॉलमध्ये आज (२४ फेब्रुवारी) पार पडली. माजी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते १ मार्च रोजी नूतन कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे.
गद्दारांना गाढून निष्ठेची गुढी उभारण्याचा संकल्प या बैठकीत करण्यात आला. या बैठकीला प्रभारी जिल्हाप्रमुख दत्ता कदम, जिल्हा समन्वयक रवींद्र डोळस, तालुका प्रमुख कमलाकर कदम, शहरप्रमुख संजय पवार, उपतालकाप्रमुख तात्या सरवणकर, युवा उपजिल्हाप्रमुख संतोष हातणकर, माजी सभापती अभिजीत तेली, महिला तालुका संघटक सौ. प्राची शिर्के यांच्यासह राजापूर तालुक्यातील पदाधिकारी व शहरातील पदाधिकारी, ज्येष्ठ शिवसैनिक उपस्थित होते.*