
आक्षेपार्ह पोस्टसंदर्भात भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते संतापले
*लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान सोशल मीडियावर अनेक चुकीचे संदर्भ देत मजकूर पसरवले जात आहेत. भाजपचे नेते, राज्याचे सार्वजनिक बांधकामंत्री, सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात अशी एक पोस्ट व्हायरल झाल्यामुळे भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते संतापले. त्यांनी या पोस्टवर कारवाई करण्याची मागणी जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.सोशल मीडियावर मंत्री चव्हाण यांच्याबाबत आक्षेपार्ह विधाने करत एक पोस्ट प्रसिद्ध झालेली आढळून आली. ज्या पोस्टच्या चुकीच्या मजकुरामुळे भाजप नेते व कार्यकर्ते यांच्यात तेढ निर्माण करणे, गैरसमज निर्माण करणे असे असल्याचे सिद्ध होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा आक्षेपार्ह पोस्ट प्रसिद्ध करणे हा गुन्हा असून यामुळे वातावरण गढूळ करून भाजपा विरोधकांना त्याचा फायदा करून घेण्याचा वाईट उद्देश स्पष्ट दिसून येतो. याबाबत तपास आणि खातरजमा करून या पोस्टकर्त्यावर तसेच लेखकावर त्वरित कारवाई करावी, असे भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी सांगितले. या वेळी प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, लोकसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद जठार, दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, लोकसभा सहप्रमुख बाळासाहेब माने, विनोद म्हस्के, सतेज नलावडे, तालुकाध्यक्ष दादा दळी व विवेक सुर्वे, सोनाली आंबेकर, प्राजक्ता रूमडे, योगेश मुळ्ये, संदीप नाचणकर, नीलेश आखाडे, मंदार खंडकर, राजेंद्र फाळके, अशोक मयेकर, सुशांत पाटकर, संकेत मयेकर आदी उपस्थित होते.www.konkantoday.com