मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचे हे पहिले साहित्य संमेलन-मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत

नवी दिल्ली येथे संपन्न झालेल्या ९८ व्या अखिमराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचे हे पहिले साहित्य संमेलन!ल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यशस्वी सांगता समारोपाला राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार तसेच नामवंत साहित्यिक आणि मराठी भाषिक रसिकांच्या उपस्थितीत संमेलनाचा समारोप ‘पसायदान’ सादर करून झाला.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचे हे पहिले साहित्य संमेलन! या संमेलनाच्या निमित्ताने मराठी भाषा विभागाचा मंत्री म्हणून कार्य करण्याची संधी मला मिळाली, ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे, असे ह्यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी म्हटले.संमेलनात रेल्वे यात्री संमेलनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समृद्ध साहित्य परंपरेचे दर्शन घडले. या आगळ्या-वेगळ्या उपक्रमासाठी आयोजकांचे मनःपूर्वक आभार! महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जपण्याची जबाबदारी साहित्यिक, कलावंत, आणि आपणा सर्वांची आहे.

यासोबतच, जेएनयू (जवाहरलाल नेहरू विद्यापीठ) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गनिमीकाव्यावर अभ्यास होण्यासाठी १० कोटी रुपयांचा निधी देणार आहोत. तसेच २७ फेब्रुवारीला कुसुमाग्रज यांच्या नावाने ‘अध्यासन केंद्र’ सुरू होणार आहे, असे मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सांगितले.याप्रसंगी संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर, सरहदचे संचालक संजय नाहर, तसेच संमेलनाचे पदाधिकारी, सदस्य आणि विविध साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button