
मुंबईहून केवळ शंभर रुपयात आपल्या गावाला या,अा.नितेश राणे यांचा उपक्रम
दरवर्षी प्रमाणे यंदाही गणपती सणासाठी मुंबईहून केवळ शंभर रुपयात आपल्या गावाला येता येणार आहे. आमदार नितेश राणे यांनी ही सोय केली आहे. आमदार नितेश राणे दरवर्षी शंभर रुपयात गावाला येण्यासाठी चाकरमान्यांची सोय करतात. ही सोय खास गणपती सणासाठी असते. यामध्ये लाखो हजारो भाविक आपल्या गावाला केवळ शंभर रुपये खर्च करून येत असतात. आज मुंबईहून आपल्या गावी यायचे असेल तर किमान सातशे ते हजार रुपये प्रति माणशी खर्च येतो. मात्र आमदार नितेश राणे यांनी गोरगरीब चाकरमान्यांना आपल्या गावी येता यावे .म्हणून ही सोय केली आहे आमदार नितेश राणे यांनी ट्विट करून ठाणे वसई ते डोंबिवली गाड्या सुट्टी त्याचा लाभ घ्या. असे आवाहन चक्क मालवणीत केले आहेत. याबाबतची अधिक माहिती लवकरच कळवली जाईल असेही त्यांनी म्हटले आहे.
www.konkantoday.com