भंडारपुळे पशुबळी संशय प्रकरणी चार आरोपींना अटक
दोन दिवसांपूर्वी भंडार पुळे येथे रेडकू (पशुबळी )बळी देण्याच्या प्रयत्न झाला होता. त्या प्रकरणी पोलिसांनी प्राण्याला क्रूरतेने वागविल्याच्या आरोपावरून गोपीनाथ झेपले राहणार कोसुब,संजय का नेरे,राहणार आेझरे ,विश्वनाथ धावडे राहणार निवे,संतोष धावडे, देवधामापूर यांना अटक केली आहे यातील आरोपींनी भंडारपुळे नांदेश्वर डोंगरात म्हशीच्या रेड कूला क्रूरपणे वागणूक देऊन निर्दयतेने वागविले तसेच आपल्या बोलेरे गाडीतून विनापरवाना गुरांची वाहतूक केली म्हणून पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केले व त्यांच्या ताब्यातील रेडकु ताब्यात घेतले.
www.konkantoday.com