
लोटे औद्योगिक वसाहतीमधील लक्ष्मी ऑरगॅनिक्स या कंपनीत गॅस गळती.
खेड तालुक्यात असलेल्या लोटे औद्योगिक वसाहतीमधील लक्ष्मी ऑरगॅनिक्स या कंपनीत सायंकाळच्या सुमारास गॅस गळती झाली. या दुर्घटनेत कंपनीतील एका कामगाराला गॅसची बाधा झाली असून त्याला चिपळूण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.लोटे वसाहतीमधील लक्ष्मी ऑरगॅनिक्सम या रासायनिक कारखान्यात सायंकाळी 4.45 वाजण्याच्या दरम्यान नॉकस नावाचे गॅस शिपटींगची प्रक्रिया सुरू असताना व्हॉल लिक झाल्यामुळे वायू गळती झाली.
यावेळी कंपनीतील एका कामगाराला गॅसची बाधा झाली असून त्याला तातडीने चिपळूण येथील अपरांत हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.लोटे वसाहतीमध्ये सातत्याने वायुगळतीच्या होणाऱ्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याची गंभीर दखल घेऊन कारखान्यातील सुरक्षेच्या उपाययोजनांची तपासणी करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.