
गृहराज्यमंत्री योगेश कदम पायी पोहचले थेट घेरापालगडावर
मी ज्या भूमीत जन्मलो त्या पवित्र मातीला छत्रपती शिवाजी महाराजांचा झालेला पदस्पर्श अन किल्ल्यावर महाराजांचा राज्याभिषेक करण्याचा मिळालेला सन्मान हे माझे भाग्यच आहे, अशी भावना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केली. शिवजयंतीचे औचित्य साधून ते बुधवारी सकाळी थेट पायी खेड तालुक्यातील घेरापालगडावर पोहचले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिषेक करत महाराजांचा इतिहास वाचून बोध घेण्याचे उपस्थित तरूणांना आवाहनही केले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी घेरापालगड येथे किल्ला बांधला. या किल्ल्याचा वापर टेहळणीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या घेरापालगड किल्ल्याचे रूपडे पालटण्यासाठी निधीची तरतूदही केली आहे. यासाठी शिवसेना नेेते रामदास कदम यांनी सातत्याने निधीसाठी पाठपुरावाही केला होता. लवकरच किल्ल्याला नवा साजही चढणार आहे.www.konkantoday.com