
संजय राऊत यांच्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची विश्वसनीयता खालवली – माजी प्रवक्ते किशोर तिवारी.
संजय राऊत पक्षाचे विचार आणि भूमिका मांडत नाही, ते फक्त स्वतःचे विचार मांडतात. त्यांच्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची विश्वसनीयता खालवली आहे.हे म्हणणं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्ता पदावरून नुकतंच हकालपट्टी झालेल्या किशोर तिवारी यांचं. तर मी एबीपी माझाच्या झिरो अवर कार्यक्रमांमध्ये सहभागी झालो, 8:30 वाजता शो संपला आणि 8:45 ला पक्ष प्रवक्ता पदावरून माझ्या हकालपट्टीचा आदेश निघाल्याचा गौप्यस्फोटही किशोर तिवारी यांनी केला आहे.
एवढेच नाही तर निवडणुकीच्या काळात प्रवक्ता असतानाही मला प्रसारमाध्यमांवर हिंदुत्वाची लाईन घेण्यापासून रोखण्यात आले होते. कारण मुंबईत वरुण सरदेसाई आणि आदित्य ठाकरेंच्या विजयासाठी मुस्लिमांचा मतदान आवश्यक होते. त्यामुळे हिंदुत्वाची भूमिका मांडण्यापासून पक्षाकडून थांबवण्यात आल्यास गंभीर आरोपही किशोर तिवारी यांनी केला आहे.