
रत्नागिरी शहरात डेंगूचे थैमान : मनसेने विचारला मुख्याधिकाऱ्यांना जाब..!
रत्नागिरी शहरात डेंगूचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत..शहरात विविध ठिकाणी साचलेले पाणी..मुख्यतः अनेक इमारतीमध्ये सांडपाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था कोलमडून गेली असल्याने मच्छरांचे साम्राज्य निर्माण झाले असून त्याची परिणीती डेंगू सारख्या आजाराने घेतली असून यावर लवकरात लवकर प्रभावी उपाय योजना करावी अन्यथा आम्ही मनसे पद्धतीने यात लक्ष घालू असे आज रत्नागिरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. तुषार बाबर यांना ठणकावून सांगण्यात आले..या प्रश्नाकडे बघण्याचा नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांचा दृष्टिकोन उदासीन व बेपर्वाई दिसत असल्याने याचा जाब आज मुख्याधिकाऱ्यांना विचारण्यात आला..याप्रसंगी मनसे तालुकाध्यक्ष श्री.रूपेश जाधव, तालुका सचिव अॅडव्होकेट अभिलाष पिलणकर, विभाग अध्यक्ष श्री.अखिल शाहू, श्री. जयेश फणसेकर , श्री सोम पिलणकर आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.