
अर्जुना प्रकल्पाला नियोजनात लाभार्थी शेतकरी वार्यावर
गेले अनेक वर्षे शेकडो कोटींच्या कोटी उड्डाणे झालेल्या राजापूर तालुक्यातील अर्जुना नदी खोर्यातील करक पांगरी येथील अर्जुना मध्यम पाटबंधारे प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असल्याचा शासकीय निष्कर्ष पुढे येत आहे.
एवढेच नव्हे तर लवकरच या प्रकल्पाचा लोकार्पण सोहोळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे राजापूर लांजा पूर्व भागातील एकूण पाच हजार ७०४ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. मात्र या प्रकल्पाच्या नियोजनात लाभार्थी शेतकर्यांना समाविष्ठ करून घेणे गरजेचे आहे, असा जनतेचा सूर आहे.www.konkantoday.com