
“ज्या गावात उद्धवसेनेचा सरपंच, तिथे निधी नाही, आताच भाजपात या नाहीतर बसा बोंबलत!”
सावंतवाडी – ज्या गावात उद्धवसेनेचा सरपंच असेल त्या गावाला निधी नाही, बसा बोंबलत. एप्रिलनंतर यादीच घेऊन बसणार मग कळेल आपण उद्धवसेनेत थांबून किती चूक केली ती तुम्ही कितीही टीका करा पण मी माझा पक्ष वाढवणारच. माझ्या नेत्यांना काय ते स्पष्टीकरण देईन पण निधी देणार नाही एवढ्यावर मी ठाम आहे अशा शब्दात मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी विरोधकांना इशारा दिला. ते सावंतवाडीत भाजप संघटन पर्व कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकी पूर्वी पक्षातून गेलेली घाण पक्षात पुन्हा येणार नाही याची खबरदारी घेतली जाईल असे आश्वासन ही उपस्थित कार्यकर्त्यांना दिले. यावेळी मंत्री नितेश राणेंच्या उपस्थित उद्धव सेनेच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला. यात मडुरा येथील उल्हास परब समीर गावडे सचिन पालव यांच्यासह दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. मंत्री राणे म्हणाले, ज्या गावात महायुतीचा सरपंच नाही त्या गावात निधी नाही हे मी यापूर्वी बोललो आणि आता पण सांगतो आम्ही पक्ष वाढवण्यासाठी बसलो आहोत. जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार होते तेव्हा ते आमच्या याद्या कशा फोकून द्याचे हे आम्ही सहन केलं आहे.
मग त्याची परतफेड करावीच लागेल अशा शब्दांत राणे यांनी इशारा दिला आहे.यावेळी त्यांनी माजी आमदार राजन तेली व विशाल परब यांना नाव घेता कडक शब्दांत समज दिली पुन्हा सावंतवाडी मतदारसंघावर बाहेरची घाण नको काही जण आमच्या नेत्यांवर टीका करून बाहेर पडले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संभाषण व्हायरल करण्याचे धाडस केले जाते त्यांना आता सोडायचे नाही जर पुन्हा पक्षात येण्याचे धाडस करणार नाही आणि आलेच तर त्याना सोडू नका असे सांगत कोणाला तरी भेटतात आणि पक्षात येण्याची स्वप्ने बघत असतील तर दरवाजावर मी उभा आहे आणि याच्या कुंडल्या ही माझ्याकडे आहेत हे लक्षात ठेवा असा इशाराच नितेश राणेंनी यावेळी दिला. तसेच येथील कार्यकर्ता सक्षम होण्यासाठी मी सौदव तुमच्या पाठीशी असल्याचा शब्द राणे यांनी कार्यकर्त्यांना दिला.