
बावनदी येथे भीषण अपघात, दोन जणांचा मृत्यू
मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असून या मार्गावर वारंवार अपघात घडत आहेत चौपदरीकरणाचे काम सुरू झाल्यानंतर अनेक अपघातात अनेक जणांचे बळी गेले आहेत आज मुंबई गोवा महामार्गावरील बावनदी येथे लोखंडी सळ्यांची वाहतूक करणारा ट्रक उलटून झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे