
महावितरण’ विरोधात ग्राहकांमध्ये संताप
महावितरण कंपनीने वीज बिलासोबत ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेव देयक दिल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. एकीकडे ‘महावितरण’कडून सध्या एप्रिलची वीज बिले अदा केली जात आहेत. या बिलांसोबत महावितरणने भरणा करण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा ठेव देयके माथी मारली आहेत. ग्राहकांना वाढीव वीज बिले व अतिरिक्त सुरक्षा ठेव देयक आल्याने ग्राहकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत असून, वाढीव बिले कमी करून अतिरिक्त सुरक्षा ठेव देयक मागे घेऊन ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी मागणी ग्राहकांतून होत आहे.