
जिल्हास्तरीय संरक्षण समितीची मासिक बैठक 24 फेब्रुवारी रोजी
रत्नागिरी, दि.20 :- माजी सैनिकांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्यासाठी जिल्हास्तरीय संरक्षण समितीची मासिक बैठक पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.
माजी सैनिकांच्या कौटुंबिक संरक्षण संदर्भात तक्रारी असल्यास सदर बैठकीस विहीत वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.