
कोकणात ४ जी सेवा बीएसएनएल ने सुरु करावी- खासदार विनायक राऊत
कोकणात ४ जी सेवा सुरू करण्याचे आश्वासन बीएसएनएल महाराष्ट्र टेलिकॉम सर्कलचे जीसीएम मनोज मिश्रा यांनी खासदार विनायक राऊत यांना दिले. कोकणात येणार्या समस्या व अपूर्ण कामांबाबत खासदार राऊत यांनी त्यांच्याबरोबर चर्चा केली. यावेळी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील बीएसएनएल सेवेसंदर्भात विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा करून येणार्या अडचणी सोडविण्यासाची मागणी केली. वीज जोडणीअभावी बंद पडलेले टॉवर पुन्हा सुरू करावेत. भविष्यात वीज जोडणी तोडली जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. मंजूर केलेल्या १०४ टॉवरपैकी फाऊंडेशन लेव्हलपर्यंत काम झालेल्या टॉवरची उभारणी करून ते कार्यान्वित असे होतील, याकडे लक्ष द्यावे अशी सूचना खासदार यांनी केली.
www.konkantoday.com