
राष्ट्रवादी पक्ष प्रतोदपदी आ. शेखर निकम, विधिमंडळाची मान्यता.
चिपळूण-संगमेश्वरचे विद्यमान आमदार शेखर गोविंदराव निकम यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या प्रतोदपती निवडीला विधिमंडळाची मान्यता मिळाली आहे.विधिमंडळ सचिवालयाचे सहसचिव शिवदर्शन साठ्ये यांच्या सहीचे मान्यतेने पत्र मंगळवारी पक्ष प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार शेखर निकम यांना देण्यात आले. पक्ष प्रतोदपदी निवड झाल्याबद्दल निकम यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.www.konkantoday.com