
जाब विचारायला गेलेल्या तरुणांवर चाकुने वार करून जखमी केले,आराेपीला अटक
गावातील बैठकीत आपण दारू विकतो अशी खोटी तक्रार का केली अशी विचारणा करायला गेलेल्या राजेंद्र माचिवले या तरुणाला मारहाण करून सुरीने हातावर व पायावर वार करून जखमी केल्याच्या आरोपावरून विजय माचिवले याच्याविरुद्ध ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला व त्याला अटक करण्यात आले आहे.हा प्रकार रत्नागिरी तालुक्यातील तरवळ माचिवले वाडीत घडला.विजय माचिवले याने वाडीच्या बैठकीत राजेंद्र हा गावात दारू विक्रीचा चोरटा धंदा करतो अशी खोटी बातमी पसरवली त्याचा जाब विचारण्यासाठी राजेंद्र हा विजयकडे आला असता विजयला राग येऊन त्याने राजेंद्रला शिवीगाळ व मारहाण केली व राजेंद्र यांच्या हातावर व डाव्या पायावर सुरीने वार केले त्यांना जखमी केले.
www.konkantoday.com