
कुंभार्ली गावचे प्रसिद्ध चित्रकार देवदास भंडारेंचे तैलचित्र पाहून अभिनेते धर्मेंद्र भारावले
कुंभार्ली गावचे सुपुत्र प्रसिद्ध चित्रकार आणि कला दिग्दर्शक श्री. देवदास भंडारे उर्फ देव यांचे तारांगण वरळी नेहरू सेंटर मुंबई येथे ९ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर २०२५ चित्रांचे हॅन्डपेंटींगचे प्रदर्शन ठेवण्यात आले आहे. यानिमित्ताने त्यांनी अभिनेते धर्मेंद्र, अभिनेते जितेंद्र, अभिनेते रणजित यांना निमंत्रित केले आहे. यावेळी त्यांनी धर्मेंद्र यांना तैलचित्राची भेट दिली. त्यांनी रेखाटलेले लोफर या चित्रपटातील धर्मेंद्र यांचे पेंटींग देवदास भंडारे यांनी त्यांना जुहू येथील त्यांच्या निवासस्थानी जावून भेट दिली. त्यावेळी प्रसिद्ध अभिनेते रणजीतही त्यांच्यासह होते.
लोफर या चित्रपटाला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. आपल्या त्या काळच्या हिट चित्रपटातले चित्र देवीदास भंडारे यांनी हुबेहुब साकारल्याबद्दल धर्मेंद्र यांनी त्यांचे कोतूक केलं. इतकंच नाही तर हे चित्र त्यांनी तातडीने त्यांच्या बंगल्यात लावलही. धर्मेंद्र यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. हे चित्र पाहून मला खूप आनंद झाला आहे. मला काय वाटतं आहे ते मला शब्दात मांडता येणार नाही, असं धर्मेंद्र म्हणाले. देवदास भंडारे यांनी विशेष फिल्म या बॅनरखाली दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या अनेक चित्रपटांचे तसेच काही मराठी चित्रपटांचे कला दिग्दर्शन केले आहे.
कला दिग्दर्शकाने दिलेलं हे चित्र पाहून धर्मेंद्र चांगलेच सुखावले. तर जितेंद्र यांनी सुद्धा त्यांच्या कामाचे कौतूक केले. विशेष करून त्यांना मराठी भाषेत शुभेच्छा दिल्या. देवदास भंडारे यांनी आतापर्यंत १५ ऍवॉर्डस हिंदी, मराठी, इंग्रजी चित्रपटांसाठी मिळाले आहेत. तसेच उत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी अनेक ऍवॉडर्स असून त्यात महाराष्ट्र शासनाचेही ऍवॉडर्स मिळाले आहेत. तसेच ते अमेरिका शिकागो वॉशिंग्टन येथे जावून आले आहेत. अशा ह्या कुंभार्ली गावच्या सुपुत्र देवदास भंडारे यांचे राज्यात कौतूक होत आहे.www.konkantoday.com