
राजापूर येथील पासपोर्ट कार्यालयामुळे मागील सहा वषार्पासून कोकणवासियांच्या मुंबईवाऱ्या थांबल्या
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या राजापूर येथील पासपोर्ट कार्यालयामुळे मागील सहा वषार्पासून कोकणवासियांच्या मुंबईवाऱ्या थांबल्या आहेत. आता हाच पासपोर्ट घरबसल्या ऑनलाईन अर्ज करूनही मिळू शकतो. त्यामुळे कोकणवासियांची परदेशवारी अधिकच सुखद झाली आहे. गेल्या सहा वर्षात राजापूर येथील पासपोर्ट कार्यालयातून 38 हजार 5०० लोकांनी पासपोर्ट काढला आहे.कोकणात पासपोर्ट कार्यालय नसल्यामुळे कोकणवासियांना पासपोर्ट काढण्याठी मुंबई येथे जावे लागत होते.
त्यामुळे वेळेसह पैशाचाही अपव्यय होत होता. गेल्या काही वर्षात परदेशामध्ये शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. आयटी, वैद्यकीय, हॉटेलसारख्या क्षेत्रात नोकरीची संधी अधिक असल्यामुळे अनेकजण परदेशामध्ये नोकरीसाठी जातात. कोकणवासियांना पासपोर्ट काढण्यासाठी कार्यालय सुरू व्हावे, अशी मागणी होती. त्यानुसार 12 ऑगस्ट 2018 मध्ये राजापूर पोस्ट कार्यालयात पासपोर्ट कार्यालय सुरू झाले. त्याचा उपयोग रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांच्या मध्यवर्ती ठिकाण आहे.