
तीर्थक्षेत्र नृसिंहवाडी येथे प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या कुटुंबीयांनी दर्शन घेतले.
तीर्थक्षेत्र नृसिंहवाडी येथे प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या कुटुंबीयांनी बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास दत्त दर्शन घेतले. तेंडुलकर कुटुंबाची येथील दत्त प्रभूंच्यावर मोठी श्रद्धा आहे.त्यामुळे हे कुटुंबीय आवर्जून येथे दर्शनाला आले होते. यावेळी सौ. अंजली, मुलगी सारा तसेच मुलगा अर्जुन तेंडुलकर यांनी श्री दत्त महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना ही केली.
बुधवारी सकाळी मुंबईहून विमानाने कोल्हापुरात साडेदहा वाजता ते आले होते. यावेळी कोल्हापुरात विविध ठिकाणी भेटी घेऊन नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिरात अंजली , सारा तसेच अर्जुन आले. यावेळी चाहत्यांनी त्यांना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दरम्यान, त्यांनी दत्त चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतले. यावेळी दत्त देवस्थानचे अध्यक्ष वैभव काळू पुजारी यांनी दत्त महाराजांची प्रतिमा भेट दिली.