
रत्नागिरी जिल्हानगर वाचनालयाचे ग्रंथसंपदेचे परिपूर्ण दालन वाचकांच्या स्वागतासाठी सज्ज ;-दीपक पटवर्धन
रत्नागिरी जिल्हा नगरवाचनालाय हे 1828 सलातली स्थापना असणारे महाराष्ट्रातले सर्वात जुने वाचनालय आहे. ब्रिटिश कौन्सिल लायब्ररी, नेटिव्ह लायब्ररी अशा नावाने सुरुवातीला हे वाचनालय ओळखले जात होते त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रत्नागिरीतल्या वास्तव्याचे वेळी रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय असे नामकरण या वाचनालयाचे केले.
वाचनालय ब्रिटिशांनी या वाचनालयात स्वातंत्र सैनिक कार्यरत असतात असा निष्कर्ष काढत हे वाचनालय अनेक वर्ष बंद केले होते. त्यामुळे या वाचनालयातील भरपूर दुर्मिळ ग्रंथसंपदा, जुने संदर्भ असलेले लिखाण हे नाश पावले.स्वामी स्वरूपानंद पावस येथून वृत्तपत्र तसेच पुस्तक वाचण्यासाठी या वाचनालयात सातत्याने येत असत असे अनेक माहितगार लोक सांगतात. न्यायमूर्ती खारेघाट हे रत्नागिरी मधले अत्यंत नावाजलेले तेवढेच लोकप्रिय जिल्हा न्यायाधीश होते, त्यांच्या कार्यकाळात परत एकदा हे वाचनालय नियमित सुरू झाल.
सन्माननीय मधू मंगेश कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली या वाचनालयाने मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते.तसेच अलीकडे स्वातंत्रवीर सावरकर साहित्य संमेलन ही या वाचनालयाचे आयोजित केले होते. डॉक्टर केळकर, डॉक्टर शिंदे ,दादासाहेब शेटे ,अरुण नेरुरकर यांच्यासारखे दिग्गज या वाचनालयाच्या विकासासाठी सातत्याने झटत होते.
रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयात सद्यस्थितीत एक लाख सात हजार पुस्तके उपलब्ध आहेत. वांग्मय प्रकारातील सर्व प्रकारचे वांग्मय या या वाचनालयात उपलब्ध आहे .मराठी ,हिंदी, इंग्रजी, संस्कृत वांग्मय या वाचनालयात वाचकांसाठी उपलब्ध आहे नव्याने येणारे वांग्मय तात्काळ वाचकांसाठी उपलब्ध करून देणे ही या वाचनालयाची खासियत राहिली आहे. अद्ययावत वाचन कक्ष, नेटकी मांडणी पुस्तकांसाठी नवीन तंत्रज्ञानाने लिप्त कपाटे ,यामध्ये नेटक्या पद्धतीने मांडलेली ग्रंथसंपदा असे या वाचनालयाचे स्वरूप वाचकांना भावते. एकविषे च्या घरात वाचक सभासद संख्या हीसुद्धा अत्यंत लक्षणीय बाब आहे .केवळ पन्नास रुपये मासिक वर्गणी घेऊन दोन पुस्तके उपलब्ध करून देणे ही बाब वाचनालयाने वसा म्हणून स्वीकारली आहे .प्रतिदिन दीडशे च्या घरात वाचक या ग्रंथ मंदिरात आपल्याला आवडणारी रोचक पुस्तके बदलण्यासाठी येत असतात. समृद्ध वाचनालय त्यामधील ग्रंथांची आणि ग्रंथप्रेमी यांची असलेली वर्दळ ही त्या नगराची उत्तम संस्कृती दर्शविण्याचे मानक समजले जाते. रत्नागिरी शहरालाअसे परिपूर्ण समृद्ध वाचनालय लाभल्याने रत्नागिरी साठी हे एक सांस्कृतिक वैभव केंद्र ठरले आहे. या वाचनालयात सातत्याने उत्तम उत्तम साहित्यिक-सांस्कृतिक आर्थिक अशा विविध विषयांवर व्याख्याने, परिसंवाद ,मुलाखती, मैफिली असे कार्यक्रम मोठ्या श्रोत्रू वर्गाच्या उपस्थित साजरे केले जातात .त्यामुळे सांस्कृतिक विश्वातही सातत्याने काम करण्याची परंपरा वाचनालयाने जोपासली आहे.
सर्वदूर वाचनालय आर्थिक संकटात असल्याचे चित्र आहे. मात्र या वाचनालयाने उत्तम नियोजन व आर्थिक शिस्त राखत सुदृढ आर्थिक पायावर हे वाचनालय उभे केले आहे नवीन तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग करत वाचनालयाने स्वतःचे सॉफ्टवेअर विकसित केले आहे. वाचनालयाचे देवाण-घेवाण पासून सर्व व्यवहार हे संगणकाच्या माध्यमातून केले जातात. वाचनालयाने स्वतःची वेबसाईट लॉन्च केली असून, रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय या नावाने ॲप ही विकसित केले आहे या या ॲपच्या माध्यमातून वाचकांना वाचनालयात उपलब्ध असलेल्या एक लाख सात हजार पुस्तकांची नावाप्रमाणे, पुस्तकाच्या लेखका प्रमाणे ,पुस्तकाच्या प्रकाशना प्रमाणे सूची ॲपच्या माध्यमातून पाहता येते व आपल्याला हवे असलेल्या पुस्तकाचा संदर्भ क्रमांक व पुस्तकाची उपलब्धता याबाबत निश्चितता करता येते. ॲपच्या माध्यमातून वाचनालयात उपलब्ध असलेल्या पुस्तकांची माहिती वाचक घरबसल्या घेऊ शकतात. सदर ॲप प्ले स्टोअर वर उपलब्ध आहे कोणीही ते सहज डाऊनलोड करू शकतो.अशा पद्धतीने नवीन तंत्रज्ञानाचा वापर या सर्वात जुन्या वाचनालयाने जाणीवपूर्वक व उपयुक्त पद्धतीने केला आहे.
रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय रत्नागिरीतील विद्यार्थी वर्ग ,सर्व नागरिक बंधू ,भगिनी या सर्वांना वाचनालयाचे सभासद होऊन वाचनालयात असलेल्या ग्रंथसंपदेचा आस्वाद घ्यावा असे आवाहन रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय करत आहे .शासनाने लवकरात लवकर वाचनालय सुरू करावीत व प्रदीर्घ काळ पुस्तकापासून दूर राहिलेल्या वाचकांना ग्रंथालयात येऊन पुस्तकांना भेटण्याची ची संधी उपलब्ध करून द्यावी अशी विनंती ती रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाचे अध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी केली आहे.