खेड तालुक्यातील खोपीतून दोन किलो गांजा जप्त.

खेड तालुक्यातील खोपीनजिक गांजाची वाहतूक करताना एकाला पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मंगळवारी सायंकाळच्या सुमारास रंगेहाथ पकडले. संशयिताकडून पोलिसांनी दोन किलो गांजा जप्त केल्याचे समजते. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी कारवाई सुरू होती. त्यामुळे याबाबतचा अधिक तपशिल उपलब्ध होवू शकला नाही.पोलीस निरीक्षक भोयर पुन्हा अवैध धंद्याविरोधात ऍक्शन मोडवर आले आहेत. यापूर्वी गुटखा विक्रेत्यांसह गांजाची विकि करणार्‍यांना चाप लावत कनेक्शनही उघड केले होते.

गावठी हातभट्टीच्या दारूसह मद्याची विक्री करणार्‍यांविरोधातही पोलिसांचे धाडसत्र सुरूच आहे.खोपीनजिक गांजाची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळताच पो. नि. भोयर व पथकाने सापळा रचला. या सापळ्यात गांजाची वाहतूक करणारा अलगद सापडला. सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसांकडून पंचनाम्याचे काम सुरू होते. संशयितांनी हा गांजा नेमका कुठून आणला आणि तो कोणाला विकणार होता, याबाबत पोलिसांकडून रात्रीउशिरापर्यंत तपास सुरू होता.

गांजा वाहतुकीसह विक्रीचे नेमके कनेक्शन उघड करण्यासाठी पोलिसांकडून सार्‍या शक्यतांचा पडताळा करण्यात येत आहे. याबाबतचा अधिक तपास जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन भोयर करत आहेत.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button