
राज्यस्तरीय मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धेत लहान गटात स्वानंदी चव्हाण प्रथम
▪️पुणे येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धेत कै.रमेश अनंत साळवी प्रतिष्ठान संचालित, पुषदत्त इंग्लिश माध्यम स्कूल खेडशी रत्नागिरी ची विद्यार्थिनी स्वानंदी निलेश चव्हाण ही प्रथम आली आहे.
▪️पुण्याच्या समर्थ भारत अभियान ,श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
▪️ स्वानंदी ने तालुका,जिल्हा स्तर लीलया ओलांडत राज्यस्तरीय ला आपली मोहोर उमटवत प्रथम क्रमांक पटकावला.यशस्वी विद्यार्थिनीला सौ अस्मि चव्हाण, सौ.तळगावकर यांनी मार्गदर्शन केले.
▪️या स्पर्धेत सुमारे २४ हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचा निकाल खूप अटीतटीचा लागला.अंतिम फेरीत एकूण ५०० स्पर्धकांतून ८३ जणांनी विजेते पदावर आपले नाव लिहिले.त्यात रत्नागिरी संघातील एकूण २८ जणांनी विजेते पद प्राप्त केले आणि रत्नागिरी जिल्ह्याला अभूतपूर्व यश मिळाले.
▪️रत्नागिरीतील विद्यार्थी सहभागी होण्यासाठी डॉ निशिगंधा पोंक्षे व सहकाऱ्यांनी मेहनत घेतली.यशस्वी विद्यार्थिनींचे प्रशालेत अभिनंदन करण्यात आले.
▪️, मुख्याध्यापिका सौ ईशा गोताड, सौ रेखा जाधव उपस्थित होते.
▪️यशस्वी विद्यार्थींनींचे संस्था अध्यक्ष श्रीमती अरुणा साळवी व अन्य संचालकांनी अभिनंदन केले आहे.