
येगांव (ता. चिपळूण) येथे परिसरातील कचरा गोळा करुन जाळत असताना वृद्ध महिला ६० टक्के भाजली.
येगांव (ता. चिपळूण) येथे परिसरातील कचरा गोळा करुन जाळत असताना वृद्ध महिला ६० टक्के भाजली. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. प्रगती पर्शुराम महाडिक (वय ६०, रा. येगांव, चिपळूण) असे भाजलेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. १७) सकाळी नऊच्या सुमारास येगांव येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रगती महाडिक या घरी असताना त्यांनी घराच्या परिसरातील पाला-पाचोळा गोळा करुन तो जाळला. तेथे शेकोटी घेत असताना प्रगतीच्या गाऊनने पेट घेतला. त्यामध्ये त्या ६० टक्के भाजल्या उपचारासाठी खासगी रुग्णालय उपचार करुन तिच्या मुलीने प्राथमिक आरोग्य केंद्र कामथे येथे दाखल केले होते. अधिक उपचारासाठी मंगळवारी (ता. १८) जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.