
आंगणेवाडीच्या यात्रेसाठी धावणार कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या; पाहा संपूर्ण वेळापत्रक
कोकणातील आकर्षणाची आणि कोकणवासियांच्या श्रद्धेचं स्थान म्हणजे आंगणेवाडीची आई भराडी देवीची यात्रा. दरवर्षीप्रमाणे यंदाही २२ फेब्रुवारी २०२५ रोजी हा यात्रोत्सव पार पडणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण तालुक्यातील आंगणेवाडीच्या आई भराडी देवी मंदिरात हा यात्रोत्सव पार पडतो. यावेळी असंख्य भाविक मोठ्या भक्तीभावाने या यात्रेत सहभागी होतात. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातील भाविक भराडी देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरात येत असतात. आंगणेवाडीच्या यात्रेनिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता भारतीय रेल्वेने कोकणात विशेष अतिरिक्त ट्रेन्स सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
आंगणेवाडी यात्रा २०२५ निमित्त प्रवाशांची सोयीसाठी मध्य रेल्वेने इतर रेल्वे विभागांशी समन्वय साधून लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) आणि सावंतवाडी रोड दरम्यान अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांचे तपशील खालीलप्रमाणे आहेत:
१) गाडी क्रमांक ०११२९/०११३०: लोकमान्य टिळक (टी) – सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक (टी) विशेषगाडी क्रमांक ०११२९लोकमान्य टिळक एलटीटी ते सावंतवाडी रोड ही विशेष ट्रेन २१ फेब्रुवारी २०२५ (शुक्रवार) रोजी लोकमान्य टिळक (टी) येथून रात्री १२:५५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल.
गाडी क्रमांक ०११३०सावंतवाडी रोड ते लोकमान्य टिळक एलटीटी ही विशेष ट्रेन सावंतवाडी येथून २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६.१० वाजता लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल. ही ट्रेन ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकांदरम्यान थांबेल.
कोचची रचना: १९ एलएचबी कोच ज्यामध्ये फर्स्ट एसी (१), टू-टायर एसी (२), थ्री-टायर एसी (६), स्लीपर (८), जनरेटर कार (२) यांचा समावेश आहे.२) गाडी क्रमांक ०११३१/०११३२: लोकमान्य टिळक (टी) – सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक (टी) विशेषगाडी क्रमांक ०११३१लोकमान्य टिळक एलटीटी ते सावंतवाडी रोड स्पेशल ट्रेन २२ फेब्रुवारी २०२५ (शनिवार) रोजी रात्री १२.५५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १२ वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल.
थांबे – ही ट्रेन ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकांवर थांबेल.
गाडी क्रमांक ०११३२ही ट्रेन २२ फेब्रुवारी २०२५ (शनिवार) रोजी सायंकाळी ६ वाजता सावंतवाडी रोडवरून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६:१० वाजता लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल.
थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ
कोचची रचना: २२ एलएचबी कोच ज्यामध्ये टू-टायर एसी (१), थ्री-टायर एसी (६), स्लीपर (९), जनरल (४), जनरेटर कार (१), एसएलआर (१) यांचा समावेश आहे.
तिकीट बुकिंग:ट्रेन क्रमांक ०११३० आणि ०११३२ चे आरक्षण ९ फेब्रुवारी २०२५ रोजी पीआरएस काउंटर, आयआरसीटीसी वेबसाइट आणि ऑनलाइन तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्मद्वारे सुरू झाले आहे.
३) गाडी क्रमांक ०११३४/०११३३: सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक (टी) – सावंतवाडी रोड स्पेशलगाडी क्रमांक ०११३४ही ट्रेन २३ फेब्रुवारी २०२५ रोजी (रविवार) सायंकाळी ६:०० वाजता सावंतवाडी रोडवरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६:२५ वाजता लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल .गाडी क्रमांक ०११३३ ही ट्रेन लोकमान्य टिळक (टी) येथून २४ फेब्रुवारी २०२५ (सोमवार) रोजी सकाळी ८:२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी ७:०० वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल.
थांबे: कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे.कोचची रचना: २० एलएचबी कोच ज्यामध्ये टू-टायर एसी (१), थ्री-टायर एसी (३), थ्री-टायर एसी इकॉनॉमी (२), स्लीपर (८), जनरल (४), जनरेटर कार (१), एसएलआर (१) यांचा समावेश आहे.तिकीट बुकिंग: ट्रेन क्रमांक ०११३४ चे आरक्षण ९ फेब्रुवारी २०२५ पासून सुरु झाले आहे.
https://www.enquiry.indianrail.gov.in वर जाऊन किंवा NTES अॅप वापरून या विशेष ट्रेनचे थांबे, सुटण्याची वेळ आणि स्टेशन याची माहिती तपासू शकतात. या गाड्यांचे बुकिंग भारतीय रेल्वे प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS), ऑनलाइन बुकिंग प्लॅटफॉर्म आणि IRCTC वेबसाइटद्वारे केले जाऊ शकते. या विशेष ट्रेन्समुळे आंगणेवाडी यात्रेसाठी सिंधुदुर्गात येणाऱ्या चाकरमान्यांना सुखकर प्रवास करता येणार आहे.