
मेडिकल कॉलेजमध्ये रत्नागिरीचा कोटा वाढवून घेणार-आमदार भास्कर जाधव.
रत्नागिरी येथील मेडिकल कॉलेजमध्ये दोनशे विद्यार्थी असून त्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील फक्त तीनच विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या मेडिकल कॉलेजचा कोल्हापूरच्या धर्तीवर रत्नागिरीचा कोटा वाढवून घेणार असल्याचे प्रतिपादन आमदार भास्कर जाधव यांनी केले.
महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग 15 वा वित्त आयोगांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय गुहागरच्या सुसज्ज नूतन इमारतीचे उद्घाटन आ. जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. तसेच प्रयोगशाळेचे उद्घाटन माजी जि. प. अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या हस्ते तर तालुका आरोग्य अधिकारी दालनाचे उद्घाटन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. घनश्याम जांगिड यांनी तर आरोग्य माहिती व्यवस्थापन कक्षाचे उद्घाटन गट विकास अधिकारी शेखर भिलारे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर आमदार भास्कर जाधव, जि. प. चे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव, उबाठा शिवसेना गुहागर तालुकाप्रमुख सचिन बाईत आधी जण उपस्थित होते