
भजनावरून झाला वाद ग्रामपंचायत सदस्याच्या डोक्यावर कोयतीने वार
गुहागर : तालुक्यातील भातगांव येथील मंदिरात भजन करू नये असे सांगितल्याने राग आलेल्या विजय कदम याने भातगाव ग्रामपंचायतीचे सदस्य व माजी उपसरपंच उमेश कदम यांना शिवीगाळ करत त्यांच्या डोक्यात कोयत्याने वार केल्याची फिर्याद उमेश कदम यांनी पोलीस स्थानकात केली आहे. भातगाव ग्रामपंचायतीचे सदस्य उमेश कदम हे गावातील राधाकृष्ण मंदिरात श्रावण महिन्यात ग्रामस्थांना घेवून भजन करतात. दोन वर्षापासून गावातील विजय कदम यांनी रत्नागिरीतील नातेवाईकांना बोलावून भजनाचा कार्यक्रम करू लागले. विजय कदम यांना भजनासाठी रत्नागिरीहून नातेवाईक बोलावू नये असे सांगितल्याने त्याला राग येवून त्याने रागाच्या भरात हे कृत्य केले.
www.konkantoday.com




