
बिग बॉस मराठी’ फेमअंकिता वालावलकर लग्नाच्या बंधनात अडकली,लग्नसोहळ्याला नितेश राणेंची उपस्थिती,
बिग बॉस मराठी’ फेम आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकर लग्नाच्या बंधनात अडकली आहे.बॉयफ्रेंड कुणाल भगतसोबत अंकितानं लग्नगाठ बांधली. अंकिता आणि कुणाल भगत यांचा विवाहसोहळा कोकणात निसर्गाच्या सानिध्यात एका मंदिरात थाटामाटात पार पडला. या सोहळ्याला विद्यमान आमदार व कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी उपस्थिती लावली होती.
नितेश राणे यांनी अंकिता व कुणालला पुढील वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. नवदाम्पत्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यांनी खास पोस्ट लिहिली आहे. त्यांनी लिहलं, “सिंधुदुर्गची सुकन्या ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर हिच्या लग्न सोहळ्यास उपस्थित राहून नवदांपत्यास पुढील वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या”.अंकिता वालावलकर मुळची कोकणातील मालवणातली. तर तिचा नवरा कुणालचं गाव अलिबाग आहे. कुणाल भगत हा मराठी सिनेविश्वातील संगीतकार आहे.