
गोविंदगडावर शिवजन्मोत्सव साजरा केला जाणार.
राजे सामाजिक प्रतिष्ठान गोवळकोट व गोवळकोट ग्रामस्थ यांच्यावतीने शहरातील गोवळकोट येथील ऐतिहासिक दुर्ग गोविंदगडावर बुधवारी (ता.१९) शिवजन्मोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.या कार्यक्रमाचे हे ११ वे वर्ष आहे. यानिमित्त बुधवारी सकाळी ७ वाजता ऐतिहासिक दुर्ग गोविंदगड पूजन, गडदेवता श्री देवी रेडजाई मातेचे पूजन व ध्वजपूजन, सकाळी ९.३० वाजता शिवप्रतिमेचे पूजन आणि आरती, १० वाजल्यापासून राजे सामाजिक प्रतिष्ठानच्या संग्रहातील ऐतिहासिक व पुरातन वस्तूंचे प्रदर्शन, सायंकाळी ४ वाजता मान्यवरांचे स्वागत आणि विविध ऐतिहासिक कार्यक्रम होतील. ६.३० वाजता काडवली येथील रोहित महाराज आग्रे यांचे शिवचरित्रपर कीर्तन होणार आहे. या कार्यक्रमांना शिवप्रेमी, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राजे सामाजिक प्रतिष्ठानमार्फत केले आहे.