
कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी रिलायन्स फाऊंडेशन आता मुंबईकरांच्या मदतीला धावले
कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी रिलायन्स फाऊंडेशनने आता मुंबईकरांच्या मदतीला धाव घेतली आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग झपाटय़ाने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयाच्या वतीने वरळीच्या एनएससीआय, वांद्रे-कुर्ला येथील ट्रायडंट हॉटेल आणि सेव्हन हिल्स रुग्णालयात ८७५ खाटा उपलब्ध करून देत त्याचे संपूर्ण व्यवस्थापन पाहणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत रिलायन्स फाऊंडेशनने हा निर्णय घेतला आहे.
www.konkantoday.com