
जेलच्या आवारातून खुनाच्या गुन्ह्यातील कैदी फरार
रत्नागिरी ः रत्नागिरी येथील जेलच्या आवारातून रूपेश तुकाराम कुंभार हा बंदी क्र. सी १० कैदी पळून गेल्याची घटना घडली. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खुल्या कारागृहातून बगीच्यामध्ये काम करणारा रुपेश तुकाराम कुंभार हा बंदी शेतामध्ये काम केल्यानंतर शेतीलगत असणार्या शौचालयात गेला. तेथून तो पळून गेला म्हणून रमाकांत वसंत यादव यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.