
चिपळूण सायकलिंग क्लबचे प्रशांत दाभोळकर, डॉ. वाघमारे, खर्चे यांची १२०० किलोमीटर सायकल स्पर्धेत बाजी
चिपळूण सायकलिंग क्लबचे एसआर प्रशांत दाभोळकर, एसआर डॉ. मनिषा वाघमारे, एसआर रामचंद्र खर्चे यांनी १२०० किलोमीटरची एलआरएम स्पर्धा अवघ्या ८६ तास ५० मिनिटात पूर्ण केली. कोकणातील अग्रगण्य सायकलिंग क्लब म्हणून ज्या क्लबची ओळख आहे. त्या चिपळूण सायकलिंग क्लबच्या सदस्यांनी पुन्हा एकदा आपल्या कामगिरीने क्लबचा नावलौकीक उन्नत झाला आहे.पाटणे येथे पार पडलेल्या १२०० किमी एलआरएम या स्पर्धेत चिपळूण सायकलिंग क्लबचे सायकल सम्राट श्री. एसआर प्रशांत, एसआर राघव खर्चे, सायकल सम्राज्ञी एसआर डॉ. मनिषा वाघमागे यांनी भाग घेतला होता.
सदर स्पर्धेत १२०० कि.मी. सायकलिंग ९० तासामध्ये पूर्ण करावयाची होती. श्री. प्रशांत दाभोळकर व राघव खर्चे यांनी ही स्पर्धा अवघ्या ८६ तास ५० मिनिटात पूर्ण केली आणि ही स्पर्धा संपविण्याचा पहिला मान पटकावला. तसेच डॉ. मनिषा वाघमागे यांनी ही स्पर्धा ८९ तास ५८ मिनिटात पूर्ण केली व एलआरएम हा मानाचा सायकल क्षेत्रातला किताब पटकावला.www.konkantoday.com