तीन महिन्यांपासून बंदी असलेल्या पर्सनेट मच्छिमारीला प्रारंभ


कोकणात गेल्या तीन महिन्यांपासून मच्छिमारी बंदी लागू असल्याने पर्सनेट मच्छिमारीला (1 सप्टेंबर) सुरुवात झाली. खरंतर 1 ऑगस्टपासून मासेमारीला सुरुवात होते.मात्र पर्सनेट, फिशिंग ट्रॉलर यांना मासेमारीसाठी 1 सप्टेंबरची वाट पाहावी लागते. ती प्रतिक्षा आता संपली असून आजपासून मोठ्या नौका समुद्रावर स्वार झाल्या आहेत.
मागील महिन्याभरात समुद्राला आलेले उधाण, त्यात समुद्रामध्ये येणाऱ्या अजस्त्र लाटा आणि त्याच्या जोडीला वारा अशा प्रतिकूल स्थितीचा सामना नव्या हंगामाच्या सुरुवातीला मच्छीमारांना करावा लागला. या स्थितीमध्ये आजपासून पर्ससीन नेटद्वारे सुरु होणाऱ्या मासेमारीच्या नव्या हंगामाला सामोरे जावे लागणार आहे. मच्छिमाराला समुद्रातील प्रतिकूल ठरणारे संभाव्य हवामान अन् वातावरण, त्याच्या जोडीला समुद्राच्या पाण्यामध्ये असणारा करंट यांचा अंदाज घेत मच्छिमार बांधव हातामध्ये जाळी घेत समुद्रामध्ये झेपावण्यास सज्ज झाला आहे.

रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदर जेटीवर दरदिवशी मच्छी व्यवसायातून लाखो रुपयांची उलाढाल होत असते. तसेच पर्ससीन नेट, फिशिंग ट्रॉलर, यांत्रिक होड्या, बिगरयांत्रिक होड्या अशा सर्वच नौका मासेमारी करतात. मच्छी व्यवसायातून वर्षाला 100 कोटी रुपयांहून अधिक रुपयांची याठिकाणी उलाढाल होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button