
पन्नासहून अधिक ग्रामपंचायतीची रिफायनरीची मागणी ,मुख्यमंत्र्यां समोर माहिती ठेवणार – मंत्री उदय सामंत
राजापूर तालुक्यातील बारसू येथे रिफायनरी प्रकल्प व्हावा यासाठी शिष्टमंडळाने आपली भेट घेतली. या भेटीदरम्यान राजापूर तालुक्यातील ५० पेक्षा जास्त ग्रामपंचायतींनी ग्रामसभेचे ठराव बारसू येथे रिफायनरी प्रकल्प व्हावा अशा बाजूचे असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले. शिष्टमंडळाची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर ठेवणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांना दिली.
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या कोकण दौर्यावर असताना हा प्रश्न ऐरणीवर आला. नाणार येथील ग्रीन रिफायनरी प्रकल्प रद्द झाला असला, तरी तो बारसू येथे जागा उपलब्ध असल्याचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्याचे पुढे आले. बारसू भागात आता ग्रीन रिफायनरीबाबत स्थानिक सकारात्मक असल्याचे आजच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर दिसत आहे. शिष्टमंडळाशी चर्चेनंतर मंत्री सामंत म्हणाले, ठाकरे यांनी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेवून निर्णय देणार असल्याचे स्पष्ट केले. ती माहिती शिष्टमंडळाला दिल्याचे त्यांनी सांगितले. बारसू येथे रिफायनरी प्रकल्प होण्यासाठी साडेपाच हजार जमीन मालकांनी संमती दिली आहे. पन्नासहून अधिक ग्रामपंचायतींनी ग्रामसभेने ठराव केले आहेत. www.konkantoday.com