
उडपी स्थानकावरूनमहाकुंभ मेळ्यासाठी प्रयागराजसाठी 17 फेब्रुवारीला रेल्वे सुटणार, रत्नागिरीत थांबा
महाकुंभ मेळ्यासाठी प्रयागराजला जाणार्या भाविकांसाठी गोवा सरकारने त्यांच्या राज्यातील भाविकांसाठी तीन विशेष गाड्यांची घोषणा केल्यानंतर आता कर्नाटकमधून उडपी स्थानकावरून प्रयागराजसाठी 17 फेब्रुवारीला गाडी सुटणार आहे.कोकण रेल्वे मार्गावरून धावताना मडगावनंतर ही गाडी रत्नागिरी, चिपळूण तसेच रोहा स्थानके घेत कल्याण, नाशिकमार्गे प्रयागराजला रवाना होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात या गाडीला एकही थांबा दिला न गेल्याने भाविकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या खासदारांनी या संदर्भात आधीच रेल्वेकडे पत्रव्यवहार करूनही रेल्वेने सिंधुदुर्गबाबत दुजाभाव दाखवला आहे. काही दिवसांपूर्वीच गोवा सरकारने त्यांच्या राज्यातील भाविकांसाठी प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यासाठी तीन गाड्यांची घोषणा केली. मात्र, या गाड्या एफटीआर स्पेशल गाड्या असल्याने केवळ गोवा राज्यातील तीन स्थानकांवर प्रवाशांना घेऊन परत आणण्यासाठी या गाड्यांचे विशेष नियोजन गोवा सरकारने केले आहे.ही गाडी उडुपीतून सुटल्यानंतर बारकूर, कुंदापुरा, मूकांबिका रोड, बिंदूर, भटकळ, मुर्डेश्वर, कुमटा, गोकर्ण रोड, कारवार, मडगाव, रत्नागिरी, चिपळूण, रोहा, पनवेल, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, पिपारिया, मदन महल, कटनी, सत्ना, माणिकपूर, प्रयागराज, फतेहपूर, गोविंदपुरी आणि इटावा