
सुधारित एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प रत्नागिरी १ अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करा
रत्नागिरी, दि.14 : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प रत्नागिरी 1 मार्फत अंगणवाडी सेविका व मदतनीस रिक्त पद भरावयाची असून, इच्छूक स्त्री स्थानिक उमेदवारांनी 28 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना रत्नागिरी 1, साईप्रसाद बिल्डींग, एकता मार्ग, मारुती मंदिर, के. सी. जैन नगर, ता.जि.रत्नागिरी येथे अर्ज करावेत, असे आवाहन बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प रत्नागिरी 1 यांनी केले आहे.
ग्रामपंचायत पावस मध्ये पावस बाजारपेठ आणि पावस मोहल्ला अंगणवाडी, पोमेंडी बु. मध्ये कारवांचीवाडी आणि आदर्शवसाहत अंगणवाडी, ग्रामपंचायत कुरतडे मध्ये डुगवे अंगणवाडी, चिंद्रवली मध्ये उमरे लावगणवाडी अंगणवाडी, हातखंबा ग्रामपंचायतीत हातखंबा गाव, दांडे आडोम ग्रामपंचायतीत दांडे आडोम वरचीवाडी अंगणवाडी, हरचिरी ग्रामपंचायतीत ओशी नवेट, झरेवाडी ग्रामपंचायतीमध्ये झरेवाडी सनगरेवाडी, खानू ग्रामपंचायतीमध्ये खानू बौध्दवाडी, वेळवंड ग्रामपंचायतीत वेळवंड भायजेवाडी, मिरजोळे ग्रामपंचायतीत मिरजोळे कृष्णनगर अंगणवाडी, वेळवंड ग्रामपंचायतीत वेळवंड कोंडवाडी, फणसोप ग्रामपंचायतीमध्ये फणसोप सडा अंगणवाडी, चांदोर गा्रमपंचायतीमध्ये चांदोर मधलीवाडी आणि चांदोर दोन आंबा अंगणवाडी, गोळप ग्रामपंचायतीमध्ये गोळप मोहल्ला 2, चांदेराई ग्रामपंचायतीमध्ये इब्राहीमपटटण अंगणवाडी, नाणीज ग्रामपंचायतीमध्ये नाणीज सरफरेवाडी अंगणवाडी, शिरगाव ग्रामपंचायतीमध्ये शिरगाव गांजूर्डा अंगणवाडी, मिरजोळे ग्रामपंचायतीमध्ये मिरजोळे जांभूळफाटा अंगणवाडी या ठिकाणी अंगणवाडी सेविका रिक्त पदे भरावयाची आहेत.
शैक्षणिक पात्रता : अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस पदासाठी इयत्ता 12 वी उत्तीर्ण आवश्यक (राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास समकक्ष) अशी किमान शैक्षणिक पात्रता आवश्यक राहील. (गुणपत्रक आवश्यक)वास्तव्याची अट : ग्रामीण प्रकल्पातील अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदावर फक्त त्या गावातील ग्रामपंचायत नव्हे तर महसुली गाव/वाडी/वस्ती/पाडे मधील रहिवासी असणे आवश्यक आहे. वयाची अट : अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस पदावर सरळ नियुक्तीसाठी (By Nomination) वयोमर्यादा किमान १८ व कमाल ३५ वर्षे अशी राहिल. तथापि, विधवा उमेदवारांसाठी ही वयोमर्यादा कमाल ४० अशी राहिल. विधवा/अनाथ असलेबाबत दाखला (असल्यास दाखला), लहान कुटुंब याचा अर्थ उमेदवारास जास्तीत जास्त दोन हयात अपत्ये, जातीचा दाखला असल्यास आवश्यक, अंगणवाडी मदतनीस म्हणून कमीत कमी २ वर्षांचा अनुभव असल्यास दाखला आवश्यक, शासकीय मान्यता संस्थेचे संगणक परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्रमाणपत्र आवश्यक (MSCIT).
आवश्यक माहितीसाठी सुटटीचे दिवस वगळून इतर कार्यालयीन दिवशी सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ या वेळेत संपर्क साधावा. नमुन्यातील परिपूर्ण अर्ज स्विकारले जातील. मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही व अपूर्ण अर्जाबाबत पत्रव्यवहार केला जाणार नाही.000