
महाविकास आघाडीची शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक, रत्नागिरी व्यापारी संघाने अद्याप भूमिका स्पष्ट केली नाही
बदलापूर येथील प्रकरणावरून महाविकास आघाडीने आता शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे मात्र महाविकास आघाडीच्या रत्नागिरीतील स्थानिक नेत्यांनी याबाबत अद्याप कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही महाविकास आघाडीतील शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंदमध्ये सामील होण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे त्यामुळे शनिवारी महाराष्ट्र बंद मध्ये कोण सहभागी होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही रत्नागिरी जिल्हा व्यापारी संघाने ही याबाबतची आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही निषेध म्हणून पूर्णपणे सहभागी होणार की काही तास बाजारपेठ बंद ठेवणार याबाबत व्यापारी संघाने अद्याप आपली भूमिका मांडलेली नाही त्यामुळे या बंदमध्ये कोण सहभागी होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही