
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचा उद्धव ठाकरे गटाला पुन्हा एकदा धक्का.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे गटाला पुन्हा एकदा धक्का दिला आहे. ठाकरे गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळख असलेल्या देवगड नगरपंचायतचे दोन नगरसेवक तसेच तालुकाप्रमुख व शिरगांव येथील असंख्य शिवसैनिकांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत कमळ हाती घेतलंय.देवगड तालुकाप्रमुख मिलिंद साटम हे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जायचे मात्र त्यांनी भाजपात प्रवेश केल्याने ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातोय.या प्रवेशानंतर बोलताना नितेश राणे यांनी ही फक्त सुरवात असल्याचे सांगत नगरसेवक, तालुकाप्रमुख, जिल्हाप्रमुख नंतर माजी आमदार अशी रांग लागलेली आहे आम्हाला फक्त तारीख ठरवायची आहे.
उबाठा नावाचा गट आतां संपलेला आहे. बाळासाहेबांचे विचार तिथे राहिलेले नाहीत. महाविकास आघाडीची भावपूर्ण श्रद्धांजली झालेली आहे. आणि म्हणून जिल्ह्याचा विकास केवळ भाजपा करू शकते हा विश्वास जनतेत बसलाय त्यामुळे चांगले कार्यकर्ते भाजपात प्रवेश करत आहेत. मात्र आम्ही चांगल्यातले चांगले कार्यकर्ते घेतो घाण घेत नाही. येणाऱ्या काळात भाजपा पक्षकोकणात एक नंबरचा पक्ष असेल असा. विश्वास त्यांनी व्यक्त केला