रत्नागिरी शहरातील मुरुगवाडा परिसरातहेरॉईन सदृश्य अंमली पदार्थ, जप्त दोन जणांवर कारवाई.

रत्नागिरी शहरातील मुरुगवाडा येथील परिसरात 182 ग्रॅम हेरॉईन सदृश्य अंमली पदार्थ आणि 52.5 गॅ्रम वजनाचा गांजा सदृश्य पदार्थ व इतर साहित्य अशा 4 लाख 43 हजार 200 रुपयांच्या मुद्देमालासह दोघांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले.करमजीत सिंह जरनैलसिंह (26,मुळ रा.लखीमपुरखिरी सध्या रा.मुरुगवाडा,रत्नागिरी) आणि मोहनसिंह रामचंद्र भाट (25,रा.मुळ रा.नेपाळ सध्या रा.मुरुगवाडा,रत्नागिरी) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात पोलिस हवालदार अरुण चाळके यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, हे दोन्ही संशयित एकमेकांच्या संगनमताने आपल्या ताब्यात ब्राउन हेरॉईन व गांजा हा अंमली पदार्थ विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button