
राष्ट्रीय महामार्ग खात्याला कशेडी बोगद्यातील विजेसाठी ८० लाखांची अनामत भरावी लागणार.
मुंबई-गोवा महामार्गावरील बहुचर्चित कशेडीच्या दुसर्या बोगद्यातील १० पंखे बसवण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. बोगद्यात २४ तास वीजपुरवठ्यासाठी राष्ट्रीय महामार्ग खात्याने १० केव्ही वीज देण्याचा प्रस्ताव यापूर्वी महावितरणकडे पाठवला होता. बोगद्यात वीजपुरवठा कार्यान्वित करण्यासाठी ८० लाख रुपयांची अनामत रक्कम महावितरणकडे भरावी लागणार असून तशी प्रक्रियाही राष्ट्रीय महामार्ग खात्याने हाती घेतली आहे. यानंतरच दुसर्या बोगद्यातून पूर्ण क्षमतेने वाहतूक खुली होणार आहे.
सद्यस्थितीत कशेडीच्या एका बोगद्यातील दोन्ही बाजूकडील वाहतूक सुरू आहे तर दुसर्या बोगद्यातील कायमस्वरूपी वीजपुरवठ्यासह भोगावनजिक अपूर्णावस्थेतील पुलाची कामे, पंखे बसवण्याच्या कामासाठी सलग ५ महिन्यांचा कालावधी लोटला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पूर्ण क्षमतेने दोन्ही बोगद्यातून वाहतूक सुरू करण्याचा मुहूर्त हुकल्यानंतर पुन्हा १५ दिवसांची डेडलाईन देण्यात आली होती.www.konkantoday.com