
साखरपा-संगमेश्वर राज्यमार्ग धोकादायक बनला
केंद्र शासनाने दिलेल्या सुमारे साडेतीन कोटी रुपयांच्या विशेष निधीतून साखरपा-संगमेश्वर या राज्य मार्गाचे डांबरीकरण, रूंदीकरण संपूर्ण करण्यात आले. धोकादायक वळणे काढून अत्यावश्यक ठिकाणी नवीन मोर्या बांधण्यात आल्या आहेत. तरीही सदरचा राज्यमार्ग अधिक धोकादायक बनला आहे.
गटार बांधणीकडे ठेकेदाराने दुर्लक्ष केले. धोकादायक भागात लोखंडी रेलींग बसविण्याची आवश्यकता असतानाही त्याची दखल बांधकाम विभागासह ठेकेदाराने घेतली नाही. धोकादायक ठिकाणी फलक उभारणे कटाक्षाने टाळण्यात आले आहे.
konkantoday.com