
उद्योजक फेडरेशनचे पुरस्कार जाहीर : जीवनगौरव पुरस्कार दीपक गद्रे यांना, स्टार्टअप पुरस्कार वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क ला, उद्योजक पुरस्कार निलेश चव्हाण यांना
रत्नागिरी:- रत्नागिरी फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्ट्रिक्ट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या उद्योजकांनी स्थापन केलेल्या जिल्हा फेडरेशनच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारापैकी जीवनगौरव पुरस्कारासाठी मस्य उद्योगात भरारी घेवुन जागतिक पातळीवर रत्नागिरीचे नाव उंचावणारे रत्नागिरीचे नामवंत उद्योजक दीपक गद्रे यांना देण्यात येणारं आहे. तर सर्वोत्कृष्ट स्टार्टअप पुरस्कार वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि. यांच्या प्रशांत बबन यादव यांना, सी एस आर पुरस्कार घरडा केमिकल्स लिमिटेड लोटे परशुराम या कंपनीला देण्यात येत आहे. जागतिक उद्योजक पुरस्कार स्कॉन प्रोजेक्ट प्रा. ली. चे उद्योजक निलेश शंकर चव्हाण यांना देण्यात येणारं आहे. जिल्हा उद्योजक पुरस्कार साठी डीलाईट इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड चे अनिकेत लक्ष्मीकांत देवळे यांना देण्यात येणारं आहे. सदर पुरस्काराची घोषणा दोन महिने पूर्वी फेडरेशनच्या वतीने करण्यात आली होती. उत्पादकता रोजगारनिर्मिती एक्सपोर्ट सामाजिक जबाबदारी अशा विविध गोष्टींची पडताळणी करून तज्ञ समितीने पुरस्काराची निवड केली आहे.