
जिल्ह्यासाठी १० हजार मे. टन खत उपलब्ध
जिल्ह्यात भात शेती लावणीच्या कामाची जोरदार लगबग सुरू झाल्याने शेतकर्यांना पुरेशा प्रमाणात खत पुरवठा करण्यासाठी व निर्माण झालेल्या अपुर्या खतपुरवठ्याची दखल जिल्हा कृषी विभाग स्तरावरून घेण्यात आली आहे. जिल्ह्यासाठी आतापर्यंत १० हजार मे. टन इतके खत उपलब्ध झालेले आहे. खत पुरवठ्याचा प्रश्न निर्माण होवू नये, यासाठी विक्री केंद्राच्या ठिकाणी शेतकर्यांसाठी अंगठा रजिस्टर सुविधा उपलब्ध करण्याच्या सुचनाही दिल्या आहेत.मॉन्सूनने सर्वत्र चांगलाच जोर धरलेला असल्याने खरीपाची जोरदार लगबग जिल्हाभरात सुरू आहे. जिल्ह्यातील शेतकर्यांना वेळेत खत पुरवठा होण्यासाठी जिल्हा कृषी विभागाने नियोजन केलेले आहे. दरवर्षी जिल्ह्याला सुमारे २० हजार मे. टन खताची आवश्यकता असते. यंदा मागणीनुसार १४,६४१ टन खताची मागणी मंजूर करण्यात आली आहे. शेतकर्यांना टप्प्याटप्प्याने खतांचा पुरवठा सुरू झालेला आहे. असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. युरिया, संयुक्त, एसएसपी, एमओपी, डीएपी या खतांची मागणी करण्यात आली होती.www.konkantoday.com