
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गावरील कार अपघातात पाच जण जखमी.
मुंबई-गोवा वागदे येथे चालकाचे मोटारीवरील नियंत्रण सुटल्याने मोटार दुभाजक ओलांडून दुसऱ्या लेनवर जात उलटली तर त्याच लेनवरून गोव्याकडे जाणाऱ्या मोटार चालकाने त्याचक्षणी ब्रेक लावल्याने ती विरुद्ध लेनवर जाऊन थांबली.उलटलेल्या मोटारीतील पाच जण जखमी झाले असून, यातील एक गंभीर आहे. हे सर्व प्रवासी सर्जेकोट (ता. मालवण) येथील असून, ते पंढरपूर येथे माघवारीसाठी गेले होते. ही घटना काल दुपारी एकच्या सुमारास घडली.
अपघातावेळी लेनवर दुसरे वाहन नसल्याने मोठा अनर्थ टळला. किरण चंद्रकांत आचरेकर (वय ३९), कृष्णनाथ भगवान तांडेल (वय ७०), सत्यवान भाऊ आंबेरकर (वय ७७), नागेश संभाजी परब (वय ६६) अशी चौघा जखमींची नावे आहेत. तर सत्यवान भाऊ आंबेरकर (वय ७७) यांना गंभीर दुखापत झाली आहे.